लायन नरेश चोपडा यांचा लायन्स इंटरनॅशनल मेडल ने गौरव.

लायन्स प्रान्त  कॅबिनेट कोषाध्यक्ष पीएमजेएफ लायन नरेश चोपडा यांना  प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरिया,प्रांतपाल टीमच्या हस्ते लायन्स इंटरनॅशनल प्रेसिडेन्शियल मेडल प्रदान करण्यात आला. लायनिझम मधील हा सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे.तुमची निष्ठा, मेहनत आणि बांधिलकी यामुळे वर्षभर प्रत्येक लायन सदस्याला खंबीर साथ मिळाली. सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे लॉ .नरेश यांनी अनेक वर्षे क्लब प्रेसिडेंट पद न भूषवता कॅबिनेटमध्ये सक्रियपणे कार्य केले. यावरून हेच सिद्ध होते की पदापेक्षा आपले काम अधिक महत्त्वाचे असते.खरे नेतृत्व पदाने येत नाही, ते दृष्टी, कृती आणि सेवेने येते. हाच खऱ्या तळागाळातील लायन चा गुण आहे.आनंदाने कळवत आहोत की लायनिस्टिक वर्ष 2026-27 मध्ये ते लायन्स क्लब खामगाव संस्कृती चे क्लब प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!ही बातमी पि.आर.ओ  MJF Ln राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

जाहिरात




Post a Comment

Previous Post Next Post