नटराज गार्डनमधील व्यायाम साहित्याजवळ चिखल; पुरुष व महिलावर्ग त्रस्त

खामगाव शहरातील नटराज गार्डन येथे सकाळच्या वेळेत अनेक महिला आणि नागरिक नियमितपणे व्यायामासाठी येतात. मात्र व्यायामासाठी बसविण्यात आलेल्या साहित्याच्या परिसरात साचलेल्या चिखलामुळे व्यायाम करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  पाणी साचून चिखल निर्माण होत असल्याने नागरिकांना व्यायाम करताना घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. महिलांना व्यायाम करताना तसेच साहित्याचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन व्यायाम साहित्याजवळील चिखल हटवावा, योग्य पाणी निचरा व्यवस्था करावी व परिसर सुस्थितीत ठेवावा, अशी मागणी सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या या सुविधांचा सुरक्षित व सुकर वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Post a Comment

أحدث أقدم