"नो ऑईल नो फ्युएल" संकल्पनेतून महिला मोर्चाचा उपक्रम उत्साहात संपन्न: नामदार फुंडकर यांनी घेतला आस्वाद 

खामगाव : देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार "नो ऑईल नो फ्युएल" या संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, खामगाव यांच्या वतीने भाजपा संपर्क कार्यालय, टॉवर चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या उपक्रमात महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच नगरसेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ सामूहिकरीत्या तयार केले. तेलाचा कमीत कमी वापर करून आरोग्यदायी व पर्यावरणपूरक आहाराची संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत स्वावलंबन, ऊर्जा बचत व देशहिताच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेवटी तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم