लोखंडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. गवई यांचा पतीसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश

खामगाव : खामगाव तालुक्यातील लोखंडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. गवई व त्यांचे पती, सामाजिक कार्यकर्ते सुनील गवई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला. जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

डॉ. संतोष तायडे यांच्या विजयपथ येथील निवासस्थानी आयोजित बैठकीदरम्यान हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी धोंडीराम खंडारे, संजय बागडे, संतोष पेसोडे, गजानन धनदरे, लक्ष्मण कानेरकर डॉक्टर रावणकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सौ. गवई या लोखंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनतेतून थेट निवडणूक लढवून सुमारे ७०० मतांच्या आघाडीने विजयी झालेल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. संतोष तायडे यांच्या नेतृत्वाखाली शहरासह ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. आगामी काळात विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, माजी नगरसेवक, माजी सरपंच व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. त्यामुळे खामगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post