लॉयन्स क्लब खामगाव तर्फे डॉक्टर्स डे, सीए डे आणि राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव


​खामगाव:लॉयन्स क्लब खामगावच्या वतीने सेवाकार्याचा ध्यास जपत 1 जुलै २०२6 रोजी एका विशेष  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजाचे आरोग्य राखणारे डॉक्टर्स, आर्थिक क्षेत्राचे मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी ​'राष्ट्रीय डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लॉयन डॉक्टर अशोक बावास्कर, लॉयन डॉक्टर अपर्णा बावास्कर, लॉयन डॉक्टर गिरिश पवार, लॉयन  डॉक्टर सौ. उज्वला पवार, लॉयन डॉक्टर सुरेखा मेंढे , लॉयन डॉक्टर केशव मेंढे, लॉयन डॉक्टर चेतन सातोटे, लॉयन डॉक्टर संजीव राठोड़, लॉयन डॉक्टर परमेश्वर चवान लॉयन डॉक्टर अशोक केला आणि इतर  डॉक्टरांचा क्लबच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांनी  आजतागायत समाजासाठी दिलेल्या अहोरात्र सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

​तसेच, 'सीए डे'चे औचित्य साधून आर्थिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सीनियर लॉयन मेंबर लॉयन रतन राठी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. देशाच्या व समाजाच्या आर्थिक जडणघडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल यावेळी त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले.'फार्मर डे' (शेतकरी दिन) निमित्त  आदर्श शेतकरी म्हणून निवडक शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व हार घालून गौरव करण्यात आला.

​"आज शेतकरी राजा शेतात राबतो म्हणूनच संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा होत आहे. त्यांच्या कष्टामुळेच आपण सर्वजण आज सशक्त आणि सुरक्षित आहोत," अशा कृतज्ञतापूर्वक भावना लॉयन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

 लॉयन्स क्लब खामगावचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सचिव श्रमिक जैसवाल ह्यानी केले. लॉयन्स क्लबच्या या बहुआयामी सामाजिक उपक्रमाचे खामगाव शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post