धनगर समाज महासंघाच्या खामगाव शहराध्यक्षपदी संतोष आटोळे यांची नियुक्ती
खामगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संतोष बापूराव आटोळे यांची खामगाव शहराध्यक्ष (जि. बुलढाणा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार यांनी ९ जुलै २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रात संतोष आटोळे हे अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून त्यांच्या अनुभवाचा समाजातील सर्व घटकांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली समाज संघटन अधिक मजबूत होऊन सामाजिक बांधिलकीची कार्ये अधिक प्रभावीपणे राबविली जातील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व समाजबांधव उपस्थित होते.सदर नियुक्तीचे श्रेय श्री. शरदभाऊ वसतकार, प्रदेशउपाध्यक्ष धनगर समाज महासंघ यांना देतातया नियुक्तीबद्दल संतोष आटोळे यांच्यावर समाजबांधव, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Post a Comment