पत्नीवरील प्रेमाची अनोखी जपणूक; स्व. वर्षाताई पारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान
खामगाव : माणूस जग सोडून जातो, पण त्याच्या आठवणी आणि त्याच्यावरील प्रेम कायम जिवंत राहते, याची भावनिक प्रचिती पारसकर परिवाराने दिली. स्वर्गीय सौ. वर्षा निलेश पारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत पारसकर परिवाराच्या वतीने सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून दिवंगत वर्षा ताईंच्या स्मृती जपण्याबरोबरच गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पत्नीवरील अतूट प्रेम आणि तिच्या आठवणींना समाजसेवेची जोड देत श्री. निलेश पारसकर यांनी हा उपक्रम राबविला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अनेक गरजू कुटुंबीयांनी भोजनाचा लाभ घेत पारसकर परिवाराचे आभार मानले. "माणूस निघून जातो, पण त्याच्या स्मृती सेवाकार्यातून सदैव जिवंत राहतात," हा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.

إرسال تعليق