लायन्स क्लब खामगाव संस्कृती तर्फे श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप


खामगाव-शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीने श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

याकरीता राजकुमार गोयनका, उज्ज्वल गोयनका, नरेश चोप्रा आणि सूरज एम. अग्रवाल यांनी मदत व देणगी दिली.

या कार्यक्रमास लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष लॉ.नरेश चोप्रा, सचिव लॉ.दिव्या अग्रवाल, कोषाध्यक्ष लॉ.डिंपल शाह आणि प्रकल्प प्रमुख लॉ.वीरेंद्र शाह उपस्थित होते. तसेच, लॉ.राजकुमार गोयनका, लॉ.उज्ज्वल गोयंका, लॉ.सूरज एम. अग्रवाल, लॉ.अजय छतवानी, लॉ.मुस्कान छतवानी आणि लॉ.अभय अग्रवाल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

शाळेचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती उदापूरकर, दिगंबर आणि किशोर चौहान यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. क्लबच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

याप्रसंगी बोलताना अध्यक्ष लॉ.नरेश चोप्रा म्हणाले, शिक्षण हा राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. लायन्स क्लब भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची सेवा करत राहील.



Post a Comment

Previous Post Next Post