महावीर चौकात विद्युत तारा झाडाच्या विळख्यात; मान्सूनपूर्व छाटणीवर प्रश्नचिन्ह

खामगाव शहरातील महावीर चौक परिसरात बरालिया ट्रेडर्ससमोर उभे असलेले मोठे झाड थेट विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकले असून त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व झाडांची छाटणी करण्यात येते, मात्र हे धोकादायक झाड अद्यापही तसेच असल्याने महावितरणच्या कामकाजावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पावसाळ्यात जोरदार वारे, मुसळधार पाऊस किंवा फांद्या तुटल्यास वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच शॉर्टसर्किट, आग लागणे किंवा जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून झाडाची सुरक्षित छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. "मान्सूनपूर्व मेंटेनन्समध्ये हे झाड अधिकाऱ्यांना दिसले नाही का?" असा सवालही परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



Post a Comment

Previous Post Next Post