पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरजसिंग ठाकूर यांची पराकाष्ठा : पाईपलाईन गळती, तांत्रिक अडचणींवर मात करत नागरिकांना पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न



खामगाव शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेचे पाणीपुरवठा सुपरवायझर सुरजसिंग ठाकूर व त्यांची टीम सातत्याने कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी पाईपलाईन गळती, तांत्रिक बिघाड तसेच दुरुस्तीची कामे सुरू असल्याने त्यांच्यावर मोठा ताण येत असला, तरी प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचून समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अनेकदा एकाच दिवशी विविध भागांत पाईपलाईन फुटणे किंवा गळती होण्याच्या घटना घडत असल्याने ठाकूर यांची अक्षरशः तारांबळ उडते. मात्र या सर्व अडचणींवर मात करत शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोहोचावे, पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह सातत्याने मेहनत घेत आहेत. नागरिकांनाही पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी आल्यास प्रशासनाशी समन्वय साधून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم