डॉ. गोपाल सोनी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

खामगाव येथील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर गोपाल सोनी यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज रविवार असल्याने ते शेतात गेले होते .त्याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे प्रथम चर्चेवरून समजते. ते सदैव हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे होते . त्यांच्या निधनाची वार्ता शहरात पसरतात वैद्यकीय क्षेत्रासह त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

أحدث أقدم