मारवाडी युवा मंच खामगाव द्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
खामगाव: मारवाडी युवा मंच, खामगाव शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र. २, सतीफैल येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वही आणि पेन्सिल किटचे वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
अध्यक्ष आदित्य डिडवानिया,उपाध्यक्ष अंकित अग्रवाल,सचिव निखिलेश राठी,अक्षय डिडवानिया कोषाध्यक्ष सूरज खेतान,या स्तुत्य उपक्रमात शाळेतील शिक्षकवृंद विशेषत उपस्थित होते आणि त्यांनी मारवाडी युवा मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment