शेगावच्या चंदाताई ददगाळ राज्यस्तरीय ‘कर्तव्य दक्ष’ पुरस्काराने सन्मानित
शेगाव : सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शेगाव येथील चंदाताई ददगाळ यांची राज्यस्तरीय ‘कर्तव्य दक्ष’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संकल्प बहुउद्देशीय संस्था, पारस आणि ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, तुळंगा (बु.) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला.
रविवार, १२ जुलै २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात चंदाताई ददगाळ यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
चंदाताई ददगाळ यांच्या या यशाबद्दल शेगाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment