सैनिक भवन व शहीद स्मारकासाठी जागा उपलब्ध करावी + आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे नगराध्यक्षांना निवेदन
खामगाव : आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, खामगावच्या वतीने खामगाव शहरामध्ये सैनिक भवन व शहीद स्मारक उभारण्यासाठी नगर परिषद मालकीची योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खामगाव तालुक्यात मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक, वीरनारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कल्याणकारी उपक्रमांसाठी स्वतंत्र सैनिक भवनाची आवश्यकता असून, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहीद स्मारक उभारणेही तितकेच आवश्यक आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामराव वामनराव देशमुख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
–


Post a Comment