डीजी फर्स्ट झोन ॲडव्हायजरी बैठक व पीएसटी-प्रथम उपाध्यक्ष स्कूलिंग कार्यक्रम उत्साहात संपन्न
खामगाव, दि. १९ जुलै : लॉयन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-H2 च्या लॉयनीस्टिक वर्ष 2026-27 अंतर्गत डीजी फर्स्ट झोन ॲडव्हायजरी बैठक, पीएसटी व प्रथम उपाध्यक्ष स्कूलिंग कार्यक्रम रविवारी लायन्स आय हॉस्पिटल, खामगाव येथे लायन्स क्लब खामगाव यांच्या यजमानपदाखाली उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एमजेएफ लॉयन डॉ. अशोकजी बावस्कर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन-4 चे झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉयन महेश चांडक होते. यावेळी रिजन-8 च्या रिजन चेअरपर्सन पीएमजेएफ लॉयन अनिताजी उपाध्याय, कॅबिनेट पदाधिकारी, लॉयन्स क्लबचे खामगाव लॉयन्स क्लब नांदुरा ज्ञानगंगा, लायन्स क्लब खामगाव सिल्वर सिटी चे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत सर्व क्लबांनी आपल्या GST, GMT, GLT, GET व LCIF संबंधी उपक्रमांचा आढावा सादर केला. यावेळी झोनमध्ये १९ नवीन सदस्यांची भरती तसेच ३ एमजेएफ झाल्याची उल्लेखनीय कामगिरी सादर करण्यात आली. उपस्थितांनी या कार्याचे कौतुक करून झोनच्या यशाबद्दल अभिनंदन केले.कार्यक्रमाच्या शेवटी एमजेएफ लॉयन डॉ. अशोकजी बावस्कर यांनी पीएसटी व प्रथम उपाध्यक्ष स्कूलिंग अंतर्गत प्रभावी नेतृत्व, सेवा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि संघटन बळकट करण्याबाबत मार्गदर्शन केले.बैठकीचे सूत्रसंचालन (MOC) लॉयन धर्मेश शाह यांनी केले. कार्यक्रमाची समाप्ती आभार प्रदर्शनाने झाली.
या कार्यक्रमाचे यजमानपद लायन्स क्लब खामगाव यांनी भूषविले. कार्यक्रमाची माहिती क्लबचे पीआरओ लॉयन धर्मेश शाह व लॉयन कुलबीरसिंह पोपली यांनी दिली.

Post a Comment