खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथराव शिंदे यांच्या षष्टीपूर्ती वर्षानिमित्त आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. अमोल अशोकराव अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या "शिवसंवाद यात्रा–२०२६" संदर्भात आज सोमवारी खामगाव येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली.

पत्रकार परिषदेत २६ जुलै ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत खामगाव विधानसभा मतदारसंघातील १६१ गावांमध्ये शिवसंवाद यात्रा राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या यात्रेद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधत विविध सामाजिक, धार्मिक, जनसंपर्क तसेच लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांनी दिली.


यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, गजानन धोरण, तालुकाप्रमुख राजू बघे, युवासेना विधानसभा प्रमुख सागर गावंडे उपस्थित होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना पदाधिकाऱ्यांनी उत्तरे देत शिवसंवाद यात्रेचे नियोजन, उद्दिष्टे आणि जनतेच्या सहभागाबाबत सविस्तर माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post