लॉयन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या नवीन कार्यकारिणी

नरेश चोपडा यांची अध्यक्षपदी, दिव्या अग्रवाल सचिवपदी आणि डिंपल शाह कोषाध्यक्षपदी निवड



लॉयन्स क्लब खामगाव संस्कृतीचा सातवा पदग्रहण सोहळा स्थानिक अग्रसेन भवन येथे दि.१९ जुलै रोजी उत्साहाच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात २०२६-२७ या कार्यकाळासाठी नव्याने निवडलेल्या कार्यकारिणीने अधिकृतपणे शपथ घेतली व आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. लॉ. नरेश चोपडा यांनी अध्यक्ष, लॉ. दिव्या अग्रवाल यांनी सचिव आणि लॉ.डिंपल शाह यांनी कोषाध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

कार्यक्रमाचे पदग्रहण अधिकारी आणि प्रमुख पाहुणे म्हणून आयपीडीजी (IPDG) पीएमजेएफ (PMJF) लॉ.अश्विन कुमार के. बाजोरिया उपस्थित होते. लॉ.मुस्कान छतवानी यांनी त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ दिली आणि नवीन टीमला यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पीएमजेएफ लॉ.अनिता उपाध्याय (रिजन चेअरपर्सन), पीएमजेएफ लॉ.मुरलीधर उपाध्याय (एलसीआयएफ समन्वयक), डॉ. कैलास मुरारका आणि एमजेएफ (MJF) लॉ.वीरेंद्र शाह (झोन चेअरपर्सन) हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी भाषणांतून पाहुण्यांनी नवीन टीमचे अभिनंदन केले आणि त्यांना सेवाभाव, नेतृत्व, समर्पण व सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून काम करण्याचे आवाहन केले.लॉ.कल्याणी झवर आणि लॉ.सुयोग झंवर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. समारंभास उपस्थित असलेल्या सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात लॉ. नरेश चोपडा यांनी सांगितले की, क्लब शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि जनहित या क्षेत्रांतील विविध सेवा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवेल आणि समाजाच्या हितासाठी नवीन व प्रभावी उपक्रम सुरू करेल.कार्यक्रमाच्या शेवटी, लॉ.अभय अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले आणि सर्व पाहुणे, सदस्य व सहयोगी चे मनःपूर्वक आभार मानले. ही माहिती क्लबचे जनसंपर्क अधिकारी पीआरओ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post