कारगिल विजय दिनानिमित्त खामगावच्या १० माजी सैनिकांना 'सैनिक रत्न पुरस्कार – २०२६' जाहीर

खामगाव, दि. २२ : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त रविवार, २६ जुलै २०२६ रोजी दादर (मुंबई) येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आयोजित "सैनिक रत्न पुरस्कार – २०२६" सोहळ्यात खामगाव येथील १० माजी सैनिकांचा 'सैनिक रत्न' पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. खामगावसह बुलढाणा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या माजी सैनिकांमध्ये हवालदार रामराव देशमुख, हवालदार बळवंत देशमुख, सुभेदार ज्ञानेश्वर तायडे, हवालदार शंकर खंडारे, सुभेदार चंद्रकांत पहुरकर, सुभेदार मेजर संजय माजोडकर, हवालदार शंकर चौकसे, नायक रविंद्र पवार, नायक मंगेश खिरडकर आणि हवालदार ज्ञानदेव गायकवाड यांचा समावेश आहे. या सोहळ्यास सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ब्रिगेडियर (नि.) सुधीर सावंत तसेच जनरल सेक्रेटरी सुभेदार डी. एफ. निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

देशसेवेत मोलाचे योगदान दिलेल्या माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जात असल्याचे सैनिक फेडरेशनने म्हटले आहे. या सन्मानामुळे माजी सैनिकांच्या कार्याला योग्य दाद मिळण्याबरोबरच युवा पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post