लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचा एक नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम

"वारी" वृक्ष-बीज पेरणी मोहीम

खामगाव (प्रतिनिधी):आज, २३ जुलै २०२६ रोजी, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या संयुक्त विद्यमाने आणि 'वृक्षमित्र' संजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली "वारी वृक्ष-बीज पेरणी" मोहीम राबविण्यात आली. हा कार्यक्रम खामगाव रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस आणि खामगाव बस स्थानकावरून सुटणाऱ्या पंढरपूर यात्रा स्पेशल बसमध्ये आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी, स्थानिक आणि दुर्मिळ होत चाललेल्या देशी वृक्ष प्रजातींच्या बिया कागदी पाकिटांमध्ये भरून विठ्ठल भक्त, वारकरी आणि तेथे उपस्थित नागरिकांना वाटप करण्यात आल्या.


कार्यक्रमादरम्यान, रेल्वे पोलीस अधिकारी तसेच पर्यावरणप्रेमींनी संजय गुरव यांच्याकडून वृक्ष-बियांच्या वाटपाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनातील त्यांची उपयुक्तता याविषयी माहिती जाणून घेतली.

या बिया धावत्या रेल्वेतून किंवा बसमधून बाहेर फेकून देण्याची कळकळीची विनंती वारकऱ्यांना करण्यात आली. त्याऐवजी, या बिया श्री विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करून परत आणण्याचे आणि शेताच्या बांधांवर, गावाजवळील टेकड्यांवर किंवा काटेरी झुडपे असलेल्या सुरक्षित ठिकाणी त्यांची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यात अधिक हिरवागार परिसर निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमातून सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे.

या मोहिमेसाठी सौ. मंगला गुरव, गणेश कोकाटे, मनोज सुलोकर, जनाबापू मेहेत्रे, अविनाश सोनटक्के, अमोल तायडे, संजय गुरव, सचिन ठाकरे, संदेश गुरव, सुभाष बोचरे, राजेश शर्मा, साक्षी शर्मा, मयंक आणि सोहम यांच्या टीमने गेल्या महिनाभरात अथक परिश्रम घेऊन देशी वृक्षांच्या सुमारे ,००,००० बिया गोळा केल्या.

गोळा केलेल्या बियांची कागदी पाकिटे तयार करण्यात आणि मोहीम यशस्वी करण्यात अध्यक्ष PMJF लॉ. नरेश चोपडा, झोन चेअरपर्सन MJF लॉ. वीरेंद्र आर. शहा, सचिव लॉ. दिव्या अग्रवाल, कोषाध्यक्ष लॉ. डिंपल वीरेंद्र शहा, PMJF लॉ. सूरज एम. अग्रवाल आणि MJF लॉ. राजकुमार गोयनका यांचेही यात महत्त्वपूर्ण योगदान होते. ही बातमी लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे जनसंपर्क अधिकारी (PRO) एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी प्रसिद्धीसाठी जारी केली.

Post a Comment

Previous Post Next Post