खामगावातील संकल्प टेलर प्रतिष्ठानचे मालक वसंता उटाळे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

खामगाव, दि. २३ : शहरातील संकल्प टेलर प्रतिष्ठानचे मालक वसंता उटाळे यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूमागील कारणाबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post