थेते हॉस्पिटलच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रोगनिदान शिबिर
लाखनवाडा | प्रतिनिधी थेटे हॉस्पिटलच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच डॉ. गुरुप्रसाद एम. थेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, लाखनवाडा (ता. खामगाव) येथे भव्य रोगनिदान शिबिर व मोफत औषध वाटप आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची वेळ दुपारी १२ ते सायंकाळी ४ अशी असून, परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरात निःशुल्क रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद एम. थेटे (एम.बी.बी.एस., डी.सी.एच.), छातीरोग व दमा तज्ज्ञ डॉ. निलेश पांढरे (एम.बी.बी.एस., टीडीडी चेस्ट मेडिसिन) आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गौरव राठोड (एम.बी.बी.एस., डी.ओ.एम.एस., एफजीओ, एफएमआर) हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर असोसिएशन लाखनवाडा, ग्रामीण रुग्णालय, विविध फार्मा कंपन्या, कॅनोपस लॅब खामगाव आणि कुलशी फाउंडेशन खामगाव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

إرسال تعليق