पुढील २४ तासांत अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे
मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून पुढील २४ तासांत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मंत्रालय, मुंबई येथून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे नदी-नाले, ओढे व धरण परिसरात पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणांशी त्वरित संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

إرسال تعليق