लायन्स क्लब खामगाव संस्कृतीद्वारे डॉक्टर्स डे, सीए (CA) डे आणि किसान दिनाचा भव्य उत्सव
खामगाव: समाजातील विविध घटकांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीने डॉक्टर्स डे, सीए डे आणि किसान दिन साजरा करण्यासाठी एका संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान, शहरातील डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स (CAs) आणि शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने लॉ.डॉ. भगतसिंग राजपूत, लॉ.डॉ. निशांत मुखिया आणि लॉ.डॉ. सोनल टिंब्रेवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सीए डे निमित्त सीए लॉ.आशिष मोदी, सीए लॉ.आनंद सुरेका आणि सीए लॉ.प्रमोद अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. किसान दिनानिमित्त मनोज भाऊ सुडोकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष लॉ.नरेश चोप्रा म्हणाले, डॉक्टर हे जीवनरक्षक आहेत, सीए हे अर्थव्यवस्थेचे सारथी आहेत आणि शेतकरी हे अन्नदाते आहेत. जेव्हा त्यांचा सन्मान होतो तेव्हाच समाजाची प्रगती होते. लायन्स क्लब भविष्यातही असे सेवाभावी उपक्रम राबवत राहील.
या कार्यक्रमास क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. वरील माहिती (PRO) लॉ. राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


Post a Comment