MPSC परीक्षा ऑफलाईनच घ्यावी; वंचित बहुजन आघाडी व विद्यार्थ्यांचे खामगावात निवेदन
खामगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी, विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. ऑनलाइन परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे पारदर्शक व सर्वसमावेशक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी धम्मगुरु भंन्ते राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोधर, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, तालुका महासचिव बाळूभाऊ मोरे, तालुका सचिव बंडूभाऊ इंगळे, शहराध्यक्ष आकाश सरदार, प्रशीक उमाळे, माजी शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे, शाश्वत अॅकडमीचे संस्थापक सागर वाकोडे सर, सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे, गौतम सुरवाडे, रामेश्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या निवेदनावर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांच्या सह्या असून शासनाने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करून MPSC परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment