लायन्स क्लब खामगाव संस्कृतीतर्फे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न; 53 विद्यार्थ्यांची तपासणी, 19 गरजू विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

खामगाव, दि. 22 ऑगस्ट 2026 : लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने आज शनिवार, दि. 22 ऑगस्ट रोजी लायन्स आय हॉस्पिटल, खामगाव येथे अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत भव्य दृष्टी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण 53 विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 19 विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी लायन्स क्लबच्या वतीने सर्व 19 विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

या सेवाभावी उपक्रमास क्लबचे अध्यक्ष PMJF ला. नरेश चोपडा, झोन चेअरपर्सन MJF ला. विरेंद्र शहा, MJF ला. अभय अग्रवाल, प्रोजेक्ट इन्चार्ज MJF ला. राजकुमार गोयंका तसेच अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या सेवा प्रकल्पासाठी लायन्स क्लबच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग व सहकार्य केले.

अशी माहिती लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे PRO तथा Club Marketing Chairperson MJF ला. राजकुमार गोयनका यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post