खामगाव(नितेश मानकर)-वीरशैव लिंगायत समाज, खामगावच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ, महाप्रसाद तसेच आमसभेचे श्री नागय्या स्वामी मंदिर, अकोला रोड, खामगाव येथे उद्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात येणार आहे.
यावेळी आयोजित आमसभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून, आगामी काळातील सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह बाढवावा तसेच आमसभेत सहभागी व्हावे, असे
आवाहन वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment