अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग झेप; कंचनपूर गावातून प्रथमच आयआयटीसाठी निवड 

खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील कंचनपूर येथील अभय राहुल कस्तुरे या विद्यार्थ्याची प्रतिष्ठित आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) धनबाद, झारखंड येथे निवड झाली आहे. अभयच्या या यशामुळे कंचनपूर गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असून, त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

अभय कस्तुरे याने प्राथमिक शिक्षण बोथाकाजी येथे पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे विज्ञान शाखेत घेतले. आयआयटी प्रवेशासाठी त्याने नियोजनबद्ध पद्धतीने पूर्वतयारी केली. त्याच्या मेहनतीला यश मिळवत त्याने जेईई अँडव्हान्स परीक्षेत चांगले गुण मिळवून आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळविला. अभयचे वडील राहुल कस्तुरे हे अल्पभूधारक शेतकरी असून, शेतकरी कुटुंबातील मुलाने आपल्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.कंचनपूर गावातून आयआयटीसाठी निवड होणारा अभय हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशामुळे गावातील विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणा मिळाली असून, अभयवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post