खामगाव शहरातील अनेक भागांचा उद्या चार तास वीजपुरवठा बंद

खामगाव : महावितरण कंपनीच्या नियोजित देखभाल व रस्ते खोदकामाच्या कामामुळे रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी खामगाव शहरातील काही भागांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. देवजी खिमजी मंगल कार्यालय परिसरात रस्ते खोदकामाचे काम करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, ३३/११ के.व्ही. जीआयएस उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. दाल फैल फिडर, गोपाल नगर फिडर, फरशी फिडर, नांदुरा रोड फिडर आणि सिंधी कॉलनी फिडर या वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहील.

महावितरणने संबंधित भागातील वीज ग्राहकांनी या नियोजित वीजबंदची नोंद घेऊन आवश्यक नियोजन करावे तसेच कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, खामगाव शहर यांनी केले आहे. व

Post a Comment

أحدث أقدم