गौतम गवई यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती च्या सरचिटणीस पदी नियुक्ती ; जेष्ठ नेते अंबादास वानखडे यांनाही संधी
खामगाव - येथील आंबेडकरी चळवळीतील प्रामुख्याने चर्चेत असलेले नाव तसेच काँग्रेस पक्षातही आपल्या रोखठोक भूमिकेमुळे नावाजलेले व्यक्तिमत्व गौतम गवई यांची पुनःश्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर खामगाव पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते अंबादास वानखडे यांची प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागात कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सदर नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले. सदर नियुक्तीमुळे काँग्रेस पक्ष संघटना व चळवळीतील हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गौतम गवई व अंबादास वानखडे ही दोन्हीही नावे आंबेडकरी चळवळ व फुले, शाहू आंबेडकर विचारधारेशी निगडित आहेत. चळवळीतील विविध उपक्रमात उपरोक्त दोघांचाही वावर असतो. त्यातच गौतम गवई हे मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी जबरदस्त चर्चेत होते. उपरोक्त दोघांचाही ग्रामीण भागाशी दांडगा जनसंपर्क आहे, यांच्या नियुक्तीमुळे निश्चितच पक्ष संघटन मजबुती साठी लाभ होईल अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment