चाळीशी ओलांडल्यानंतर...

वयाची चाळीशी ओलांडली आणि आयुष्याचा अर्थच बदलू लागला. एकेकाळी वाढदिवस, नोकरी, लग्न, मुलांच्या यशाच्या बातम्या ऐकू यायच्या; पण आता हमउम्र मित्र, ओळखीचे, सहकारी यांच्या निधनाच्या वार्ता कानावर पडू लागल्या . प्रत्येक बातमी मनाला अस्वस्थ करून जाते आणि एकच प्रश्न पडतो—आपण खरंच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतो आहोत का?

आपण पैशासाठी, कामासाठी, कुटुंबासाठी दिवस-रात्र धावत असतो. पण या धावपळीत स्वतःलाच विसरून जातो. वेळेवर तपासणी, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्याची काळजी ही आता पर्याय नसून गरज आहे.

जीवन खूप सुंदर आहे, पण ते तितकेच अनिश्चितही आहे. त्यामुळे कृपया स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाला तुमची गरज आहे, मित्रांना तुमची साथ हवी आहे आणि समाजाला तुमचे अस्तित्व महत्त्वाचे आहे.

निरोगी राहा... कारण आयुष्याची खरी किंमत ती गमावण्याची वेळ आली की कळते.आपल्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी... आरोग्याला आजच प्राधान्य द्या.


                                - नितेश मानकर

संपादक , जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव 8208819438

Post a Comment

Previous Post Next Post