खामगाव : बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका क्रीडा संकुल, खामगाव येथे होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील १ जानेवारी २०१० नंतर जन्मलेले सर्व टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी येताना जन्माचा दाखला व आधारकार्डची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी नावाची नोंदणी करून निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही निवड चाचणी खामगाव तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, उपाध्यक्ष अनुराग बोबडे आणि सचिव किशोर भोसले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

गोवर्धन राठोड सर : 9552819949

पुरुषोत्तम निळे सर : 9011142686

📍 स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका क्रीडा संकुल, खामगाव

📅 दिनांक : ९ ऑगस्ट २०२६, रविवार

⏰ वेळ : सकाळी ९.३० वाजता

Post a Comment

Previous Post Next Post