राखीव वनक्षेत्रातून अवैध वाळू उत्खनन; ट्रॅक्टरसह ६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मोताळा : मोताळा वनपरिक्षेत्रातील पूर्व कोथळी बीटमधील वनखंड क्रमांक ५०४ मध्ये राखीव वनक्षेत्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे खामगाव येथील फिरत्या पथकाने ८ ऑगस्ट २०२६ रोजी सापळा रचून ट्रॅक्टर क्रमांक MH-28-CC-3863 पकडले.

कारवाईदरम्यान ट्रॅक्टर मधील वाळू, तीन प्लास्टिक टोपले, तीन फावडे आणि लोखंडी चाळणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हमीद शहा हारून शहा, रा. कोथळी यांच्या कडून एकूण ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वनविभागाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई फिरते पथक खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) यू. आर. राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, वनरक्षक आर. जी. अढाव व वाहनचालक रोहिदास आडे यांनी केली. ही कारवाई उपवनसंरक्षक बुलढाणा जमीर शेख, विभागीय वनाधिकारी दक्षता अमरावती कमलेश पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post