शिवसेनेच्या खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या उपजिल्हाप्रमुखपदी बाबा काळे
खामगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने, हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री. जय विजय काळे (बाबा काळे), खामगाव यांची उप जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र – खामगाव विधानसभा मतदारसंघ) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात उत्कृष्ट शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेल्या जय विजय काळे यांच्या पक्षसंघटनेतील कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी जोमाने व निष्ठेने कार्य करावे, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ही नियुक्ती शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख तथा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. नरेंद्र दादाराव खेडेकर यांच्या स्वाक्षरीने दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली आहे.
जय विजय काळे यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment