‘मराठवाडा गौरव–२०२६’ पुरस्काराने डॉ. तुषार गोंदणे सन्मानित
लोकमत मराठवाडा तर्फे प्रतिष्ठित ‘मराठवाडा गौरव–२०२६’ पुरस्काराने डॉ. तुषार गोंदणे यांना सन्मानित करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
यशस्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे आणि मंत्री मा. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गोंदणे यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. तुषार गोंदणे यांनी हा सन्मान केवळ आपला नसून, आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचा, हितचिंतकांचा आणि संपूर्ण प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा आहे, अशी भावना व्यक्त केली.
“सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे,” असे सांगत त्यांनी हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णांना आणि हितचिंतकांना समर्पित केला. त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

إرسال تعليق