धर्मवीर युथ फाऊंडेशनची खामगाव विधानसभा कार्यकारिणी जाहीर

हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित युवा शक्तीची नवी फळी सज्ज


खामगाव : मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे खामगाव विधानसभा मतदारसंघातील धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी काळात फाऊंडेशनच्या माध्यमातून संघटन अधिक बळकट करणे, हिंदुत्वाचे विचार, सामाजिक बांधिलकी आणि युवा शक्तीचे एकत्रीकरण करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार खामगाव विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेची तळमळ आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त पदाधिकारी : ऋषिकेश सुधीर पऱ्हाड — जिल्हाप्रमुख, सुमित विनोद काटे — जिल्हा सचिव, हर्ष संतोष महातो — जिल्हा संघटक, वैभव वानखेडे — उपजिल्हाप्रमुख, राहुल प्रवीण झापर्डे — तालुकाप्रमुख खामगाव, विजय कैलास सारवान — शहरप्रमुख खामगाव, रणवीर पोटे — उपशहरप्रमुख खामगाव, करण सकळकळे — उपशहरप्रमुख खामगाव, राम अमर झुराव — शहर संघटक खामगाव, सोहम रहाटोळे — शहर सोशल मीडिया प्रमुख खामगाव आणि गौरव खुमकर — विद्यार्थी आघाडी शहरप्रमुख खामगाव यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून आगामी सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. युवा शक्तीच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करून समाजोपयोगी कार्याला गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post