खामगाव : पिरॅमिड मेडिटेशन सोसायटी, खामगावच्या वतीने नागरिकांसाठी एक दिवसीय नि:शुल्क ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीधर महाराज संस्थान, चोपडे मळा, घाटपुरी रोड, खामगाव येथे होणार आहे.

या शिबिराचे मार्गदर्शन ब्रह्मश्री प्रेमनाथ सर, सीनियर पिरॅमिड मास्टर, बेंगळुरू यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ध्यानामुळे मानसिक शांती व तणावमुक्ती, आरोग्यात सुधारणा, नातेसंबंधात मधुरता, आत्मिक समाधान व आनंद, तसेच एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होते, अशी माहिती आयोजकांनी दिली.

शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी आपल्यासोबत आसन, पाण्याची बाटली, वही व पेन आणावे. जास्तीत जास्त नागरिकांनी या नि:शुल्क ध्यान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रवीण गासे व डॉ. पंकज पोतदार यांनी केले आहे. आयोजकांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दीपक महाकाळे यांनी ही माहिती दिली.

Post a Comment

أحدث أقدم