स्मार्ट कार्ड शिबिरातून समाज बांधवांना मोफत बस प्रवासाचा लाभ

खामगाव। अग्रवाल महिला मंडळ व बहू मंडळ, खामगाव यांच्या वतीने समाजबांधवांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मोफत बस प्रवास योजनेसाठी दि. 6 व 7 ऑगस्ट रोजी अग्रसेन भवन येथे स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने समाजबांधवांनी स्मार्ट कार्ड बनवून घेतले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व पात्र प्रवाशांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.या जनोपयोगी उपक्रमाचे समाजबांधवांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहजपणे मिळण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم