स्वातंत्र्य दिनानिमित्त फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल लाखनवाडा येथे विविध कार्यक्रम संपन्न 

 

आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल लाखनवाडा येथे ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक वर्ग तसेच गावातील  प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ध्वजारोहण श्री गोपाल मार्कंड यांच्या हस्ते करण्यात आले

 या स्वातंत्र्य दिनाचं अवचित साधून तीन दिवसापासून शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने  चित्रकला स्पर्धा ,वृक्षारोपण , देशभक्ती गीत  कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमासह विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक आंतरिक विकास साधण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या वतीने बक्षीस व सन्मानित  करण्यात आले व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला  या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोपालसेठ मार्कंड सोफियान उल्ला खान खंडू हटकर पांडू होळकर नारायण पांढरे रामदास सावळे शेख अलीमुद्दीन इरफान खान अझर खान बाजूला खान मोहम्मद एक लाख नौशाद खान अरुण पांढरे सोपान पांढरे आकाश वानखडे आदी मान्यवर उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापीका सौ अनुप्रिती पांढरे यांनी तर आभार प्रदर्शन सावळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाला पंचक्रोशीतील पालकांचा व गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला

Post a Comment

أحدث أقدم