खामगांव अर्बन बँकेची "६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा" उत्साहात संपन्न...
सभासद, ग्राहकांच्या अतुट विश्वासामुळेच बँकेची प्रगती - प्रा. विजयजी पुंडे
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि खामगांव अर्बन को-ऑप. या मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ ऑगष्ट २०२६ रोजी देशमुख मंगल कार्यालय, खामगांव येथे संपन्न झाली. सभेची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या थोर विभूती, विरगती प्राप्त झालेले शुर सैनिक, बँकेचें सभासद, कर्मचारी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
खामगांव अर्बन बँकेवर सभासद, खातेदारांचा असलेला प्रचंड विश्वास, नियोजनबध्द कामगिरी, कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व खामगांव अर्बन बँकेच्च्त्या टिमवर्कने केलेल्या अथक परिश्रमाचे बळावर सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात बँकेने रु.९.८६ कोटीचा निव्वळ नफा मिळविला असून बँकेने या अहवाल वर्षात सुध्दा एन.पी.ए. प्रमाण शुन्य टक्के राखले आहे. भविष्यात सुध्दा बँकेच्या प्रगतीची ही घोडदौड अशीच कायम ठेवून नातं विश्वासाचं अधिक वृध्दींगत करण्याचे संचालक मंडळाचे ध्येय आहे. असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजयजी पुंडे यांनी केले.
बँकेने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा विस्तृत लेखाजोखा अध्यक्ष प्रा. डॉ. विजयजी पुंडे यांनी सादर करतांना सांगीतले की, २४ वर्षानंतर बँकेने शाखाविस्तार केला असून, विद्यमान संचालक मंडळाचे कारकिर्दीत नविन पाच शाखांचा शुभारंभ झाला आहे. यावर्षी सुध्दा नविन शाखा सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून ३१ मार्च २०२६ चे स्थितीनुसार बँकेचे भाग भांडवल रु.३६.५२ कोटी असून ठेवी रु. १३२९.५६ कोटी आहेत व कर्जे रु.७९६.६६ कोटी आहेत. बँकेची प्रगती नेत्रदिपक असून त्याचे फलस्वरूप बैंक एक सशक्त, व सक्षम आर्थिक संस्था म्हणजे Eligibility Criteria for Business Authorisation (ECBA) या रुपात उभारी घेतांना दिसून येत आहे. बँकेच्च्या अल्प व्याजदराच्या ठेवी ह्या ३९.५०% असून हे प्रमाण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बरोबरीत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ करीता सभासदांना ७ टक्के प्रमाणे लाभांशांची तरतूद केली असल्याचे सांगीतले. मागील १५ वर्षापासून लेखा परिक्षणामध्ये बैंक अदर्जा कायम राखून आहे, तसेच मुख्य कार्यालयाची नविन प्रशस्त जागेत वास्तू निर्माण करण्याचा मानस असून त्यादृष्टीने कार्यवाही करणे सुरु आहे. यानंतर बँकेचे वतीने मांडण्यात आलेले सर्व ठराव एकमताने मंजुर करण्यात आले
आपल्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वरजी जाधव यांनी अहवाल वर्षात बँकेची व्यवसायीक वाढ समाधानकारक असून, आपल्या खामगांव अर्बन बँकेचे आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अहवालाचे अवलोकन केल्यास आपली बैंक प्रगतीपथावर असल्याचे दिसून येईल व बँकेने यावर्षी रुपये २१०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी बँकेने विविध क्षेत्रात जसे सामाजीक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतीक क्षेत्र, क्रिडा क्षेत्र, कृषि क्षेत्र, पत्रकारीता, आर्थिक क्षेत्र यामध्ये प्रभावी कार्य करणारे माननीय सभासद नरेंद्रजी पांडे, विश्वजीत मावळे, ओम बाहेकर, कैलास ढोले, विजय यादव, विजय मोरखडे, सी.ए.प्रसादजी बेलदार, विद्याताई देशमुख व वैधानिक लेखा परिक्षक कौशलजी मुंदडा यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच उद्दीष्टपूर्तीकरीता अमरावती विभागाचा, तसेच मुख्य कार्यालयातील ऑडीट विभाग व गुंतवणूक विभाग यांचा ट्राफी व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजयजी पुंडे, उपाध्यक्ष डॉ. सतिषजी कुळकर्णी, संचालक अॅड. किरणजी मोकासदार, सौ. फुलवंतीताई कोरडे, डॉ. अभयजी मंडलीक, डॉ. अनिलजी धनागरे, प्रशांतजी देशपांडे, सौ. कल्पनाताई उपरवट, डॉ. राजेशजी मुंदडा, निरजजी आवंडेकर, योगेशजी चौबिसा, डॉ. मोहनजी बानोले, अपोलोंडे, सौ. मनिषाताई माटे, संदीपजी डोळस, स्वि. तज्ञ संचालक श्री. विशालजी मंत्री, सी.ए. सौ. मीनाताई देशमुख, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वरजी जाधव, व्यवस्थापन मंडळ सदस्य नवनारायणजी छांगाणी व मोहनराव हसबनिस उपस्थित होते.
सभेचेपुर्वी बँकेने केलेल्या प्रगतीची वैशिष्टे दर्शविणारी चित्रफित दाखविण्यात आली. आमसभेचे सभेचे सुत्र संचलन अॅड. श्रीकांत निखाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन करतांना संचालक अॅड. किरणजी मोकासदार यांनी अतिशय समर्पक शब्दात केले. आमसभेच्या विषयाचे वाचन दिपक धिवार, संदिप भावसार, संतोष जाधव, प्रकाश तराळे, पराग देशमुख, श्रीकांत निखाडे, योगेश ढोले व भिमसेन आंबीलकर यांनी केले. किरण रेठेकर यांनी गायीलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी सभेचे यशस्वीतेकरीता अधिकारी व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले!


Post a Comment