अग्रवाल क्रॉकरीजचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्काराने सन्मानित

जगप्रसिद्ध जॅक्वार कंपनीच्या विक्री व्यवसायात खामगावच्या अग्रवाल क्रॉकरीजचा अव्वल ठसा

खामगाव : जगप्रसिद्ध जॅक्वार कंपनीच्या विक्री व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करत खामगाव येथील अग्रवाल क्रॉकरीज यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा सर्वोच्च पुरस्कार पटकावला आहे. मध्य प्रदेशातील पेंच येथे असलेल्या कायो रिसॉर्टमध्ये आयोजित वार्षिक अवॉर्ड सेलिब्रेशन सोहळ्यात 300 हून अधिक डीलर्सच्या उपस्थितीत अग्रवाल क्रॉकरीज यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला.

एकूण 20 सेगमेंटपैकी तब्बल 6 सेगमेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवत अग्रवाल क्रॉकरीज यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच उर्वरित 11 सेगमेंटमध्ये टॉप-4 रँकिंगमध्ये स्थान मिळवून विक्री व्यवसायातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली. या यशाबद्दल जॅक्वार कंपनीचे मालक राजेशजी मेहरा यांनी दूरध्वनीद्वारे अग्रवाल क्रॉकरीज यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हा सर्वोच्च सन्मान आनिकजी मेहरा (झोनल हेड), आशिषजी बोपचे (रिजनल हेड), ओमप्रकाशजी  पटेल (ब्रांच हेड), चेतनजी कानूनगो (एरिया हेड)  तसेच चैनल पार्टनर राकेशजी त्रिवेदी व दिलीपजी अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

अग्रवाल क्रॉकरीजने बुलढाणा जिल्हा परिसरात 42 वर्षांहून अधिक काळ आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास आणि सेवा जपली आहे. चार दशकांहून अधिक काळाची ही विश्वासाची परंपरा आणि व्यावसायिक सातत्य यामुळेच आज अग्रवाल क्रॉकरीजने जिल्ह्याच्या व्यावसायिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल अग्रवाल क्रॉकरीज, खामगाव यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post