ब्रह्माकुमारीज खामगाव सेवा केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’चा दिला मानवतेचा संदेश
खामगाव | प्रतिनिधी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, रायगड कॉलनी, खामगाव सेवा केंद्राच्या वतीने शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा संदेश दिला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शासकीय रुग्णालयाच्या डॉ. देशमुख, वैज्ञानिक अधिकारी सपना काळंबे, रक्तपेढी समुपदेशक राम अंभोरे, ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल हरणे, डॉ. राजेश राजोरे तसेच ब्रह्माकुमारीज खामगाव सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमारी सुषमा दीदी यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
रक्तदान हे मानवसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य असून, आपल्या रक्तामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, या सेवाभावातून शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ब्रह्माकुमारी सुषमा दीदी, ब्रह्माकुमारी दिव्या दीदी तसेच ब्रह्माकुमारीज परिवारातील भाऊ-बहिणींनी विशेष परिश्रम घेतले. सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
रक्तदान करणारे रक्तदाते
मिताली र्खचे, गणेश वाफडाणे, नितीन निमकर्डे, अंकिता अग्रवाल, शरद बाकल, अविनाश शेगोकार, पुर्वेश कापडे, स्वप्नील चांडक, सुमित कांर्कीडे, ईशा पिंपळे, राजू भटकर, सागर श्रीनाथ, गौरव नागदेव, कविता कोकारे, पवन सपकाळ, अमोल कराळे, स्वाती निमकर्डे, राजीव बोरे, शिवाजी निंबोळकर, सपना वसंतानी, खुशबू चावंडे, ज्ञानदेव भोरे, दिनेश खवले, गोपाल भांबेरे, अंकुश बोढळे, रवी मंदोकार, सुनीता पवार आणि अरुण आकोटकर.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ हा मानवतेचा संदेश देत ब्रह्माकुमारीज खामगाव सेवा केंद्राने समाजसेवेचा आदर्श पुढे ठेवला. शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे सेवा केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment