आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन


खामगाव - आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, खामगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO), खामगाव यांचे स्वीय सहाय्यक श्री. अनिल खिरोडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष श्री. रामराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. यादव नारायण वडतकर, श्री. रवींद्र पवार, श्री. शंकर भाऊ चोकेसे, श्री. संजय माजोडकर, श्री. शंकर खंडारे, श्री. मधुकरजी सुवे, श्री. रमेश्वर सरोदे, श्री. मंगेश खिरडकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

निवेदनात जवानांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि मनोबल अबाधित राहणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले असून, सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी “जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र! जय जवान! जय किसान!” अशा घोषणांनी सैनिकांच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post