राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास पाटील यांच्या घरावर हल्ला; कार जाळून खाक



नांदुरा - राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अंबादास हिंगणे पाटील यांच्या नांदूरा शहरातील प्रभाग क्रमांक ३, तिरुपती नगर येथील घरावर मध्यरात्री अज्ञात तरुणाने पेट्रोलच्या बाटलीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात घरासमोर उभी असलेली गाडी पेटवून देण्यात आल्याने ती जळून खाक झाली. घरावरही पेट्रोलची बाटली फेकण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास स्कुटीवरून आलेल्या एका तरुणाने दोन पेट्रोलच्या बाटल्या आणल्या होत्या. त्यापैकी एक बाटली गाडीबर, तर दुसरी घराच्या दिशेने फेकण्यात आली. त्यानंतर गाडीला आग लावून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेच्या वेळी अंबादास हिंगणे पाटील हे बाहेरगावी असल्याची माहिती आहे. अंबादास पाटील यांनी अलीकडेच सावकारी कायद्यांतर्गत जमीन परत मिळविल्याची माहिती असून, सावकारीच्या विरोधात त्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे कामही ते करीत असल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post