लायन्स क्लब खामगाव संस्कृतीतर्फे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न; ४४ विद्यार्थ्यांची तपासणी,९ गरजूंना मिळणार मोफत चष्मे

खामगाव, दि. २१ ऑगस्ट : लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने आज शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी लायन्स आय हॉस्पिटल, खामगाव येथे अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत भव्य दृष्टी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात एकूण ४४ विद्यार्थ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. यात ९ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून लायन्स क्लब तर्फे उद्या दि. २२ ऑगस्ट रोजी सर्व ९ विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

या सेवाभावी उपक्रमास क्लबचे अध्यक्ष PMJF ला. नरेश चोपडा, झोन चेअरपर्सन MJF ला. विरेंद्र शहा, क्लबचे PRO MJF ला. राजकुमार गोयंका, प्रोजेक्ट इन्चार्ज ला. चेतन एस. अग्रवाल आणि शाळेचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advt.


Post a Comment

Previous Post Next Post