धनगर समाज महासंघ व कर्मचारी संघटनेतर्फे संतोष आटोळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 

दि. ३० ऑगस्ट २०२६, रविवार रोजी स्व. विलासरावजी सभागृह येथे धनगर समाज महासंघ व कर्मचारी संघटनेच्या वतीने गुणगौरव पुरस्कार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड व निष्पक्षपणे कार्य करणारे साप्ताहिक आवाज सातपुड्याचा अहिल्या व अहिल्या न्यूज 24 मीडिया ग्रुपचे विशेष जिल्हा प्रतिनिधी श्री. संतोष बापूराव आटोळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

संतोष आटोळे यांनी गरजू नागरिकांच्या हक्कांचे प्रश्न, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध अडचणी आपल्या लेखणीतून शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष आटोळे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील पत्रकारिता व सामाजिक कार्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post