⚡ ३३ केव्ही बिघाडामुळे अर्धे खामगाव अंधारात

खामगाव : शहरातील ३३ केव्ही वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने खामगाव शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अचानक वीज गेल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, शहरातील जवळपास अर्धा भाग अंधारात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती ग्राहकांसह दुकानदार, व्यावसायिक आणि विविध आस्थापनांवरही परिणाम झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून बिघाड शोधून दुरुस्तीचे काम सुरू असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास विद्युत पुरवठा बंद झाला हा वीजपुरवठा नेमका किती वेळात सुरळीत होईल, याकडे खामगावकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post