रात्रीच्या अंधारातही विद्युत कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न; बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत
खामगाव : ३३ केव्ही वीजवाहिनीतील बिघाडामुळे शहरातील मोठ्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रीच्या अंधारातही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.
वीज कर्मचाऱ्यांनी तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिघाड दूर करून बहुतांश भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. रात्रीची वेळ, अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता नागरिकांना लवकरात लवकर वीज मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे खामगावकरांकडून कौतुक होत आहे.
नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तत्परतेने सेवा बजावणाऱ्या सर्व विद्युत कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏⚡

Post a Comment