खामगाव ( नितेश मानकर):घरात सोलर पॅनल बसवूनही महावितरणकडून अतिरिक्त आणि वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारींवर भाजप बुलढाणा जिल्हा सचिव संजय शिनगारे यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश आले असून महावितरण प्रशासनाने दखल घेत येत्या २ सप्टेंबर रोजी वीजबिल तक्रार निवारण शिबिराचे आयोजन केले आहे.​खामगाव शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांनी घरात सोलर पॅनल बसवले असूनही त्यांना भरमसाठ वीजबिले येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. स्वतः संजय शिनगारे यांच्या घरात सोलर बसवल्यानंतरही असाच प्रकार घडल्याने त्यांनी या गंभीर समस्येवर आक्रमक पवित्रा घेतला. यासंदर्भात संजय शिनगारे यांनी १६ जुलै रोजी नागरिकांसह महावितरणच्या खामगाव कार्यालयात धडक देत अतिरिक्त कार्यकारी अभियंता देशपांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण शिबीर घेण्याची ठाम मागणी त्यांनी केली होती.

संजय शिनगारे यांच्या निवेदनाची व नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महावितरणच्या खामगाव शहर उपविभागाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी शिनगारे यांना याबाबतअधिकृत पत्र  देण्यात आले आहे. महावितरणच्या पत्रानुसार, प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जुने पॉवर हाऊस, नॅशनल हायस्कूल जवळील खामगाव शहर उपविभागीय कार्यालयात विशेष तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.​महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत या शिबिरात प्रत्येक तक्रारीची नियमानुसार सखोल तपासणी केली जाईल. तांत्रिक त्रुटींमुळे ज्या ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत, त्यांना या शिबिराच्या माध्यमातून नक्कीच न्याय आणि दिलासा मिळवून दिला जाईल, असा विश्वास संजय शिनगारे यांनी व्यक्त केला असून सर्व बाधित ग्राहकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आह

Post a Comment

أحدث أقدم