१८३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी; ३८ विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप

खामगाव : लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती यांच्या वतीने अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल, खामगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १८३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आल्याने आज त्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा उदापुरकर मॅडम, सर्व शिक्षकवृंद तसेच लॉयन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमास झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉ.विरेंद्र शाह, पीएमजेएफ लॉ.सुरज एम.अग्रवाल, एमजेएफ लॉ.राजकुमार गोयनका, लॉ.संध्या गोयनका, लॉ. सरीता अग्रवाल आणि लॉ.दिव्या अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या सेवा उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट इनचार्ज एमजेएफ लॉ.राजकुमार गोयनका आणि लॉ.संध्या गोयनका यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल क्लबच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व उज्ज्वल भवितव्याची काळजी घेत लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.




Post a Comment

أحدث أقدم