पुरातन काळातील अतिशय प्राचीन खामगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असे स्वयंभू शिवचे मंदिर किन्ही महादेव या ठिकाणी श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी मोठ्या प्रमाणावर तालुका तसेच जिल्ह्यातून तसेच सर्वत्र दूरपासून भक्तगण दर्शनाला येत असतात श्रावण सोमवारी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते यावर्षी प्रत्येक श्रावण सोमवार च्या निमित्त भजनाचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले सुप्रसिद्ध ह भ प अनुप महाराज वानखडे घाटपुरी, ह भ प संतोष महाराज मनसुटे रोहना, ह भ प रेवनात महाराज हिंगणा कारेगाव, ह भ प, सुमित महाराज भिसे उमरा, यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाचे आयोजन झाले आहे तसेच संस्थांच्या वतीने तसेच लीलावती ब्लड सेंटर जांभरून रोड बुलढाणा कडून डॉक्टर कोकरे मॅडम तसेच हटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिर याचे सुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे व या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांना मिळत आहे या ठिकाणी आलेल्या सर्व भक्त जणांना दर सोमवारी महाप्रसादाचे वितरण खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे पहिला सोमवार अन्नदाते श्री रमेश ओम प्रकाश बजाज खामगाव दुसरा सोमवार अन्नदाते श्री गजाननराव प्रल्हादराव देशमुख किन्ही महादेव कर तिसरा सोमवार श्री उमरा व खेर्डी समस्त गावकरी मंडळी चौथा सोमवार श्री समस्त किन्ही महादेव गावकरी मंडळी हे असून मोठ्या भक्ती भावाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महाप्रसाद बनवण्यात येत आहे व तो वितरण करण्यात येत आहे हे देवस्थान अतिशय प्राचीन असून या देवस्थानावर प्रचंड श्रद्धा व आस्था भक्तांची आहे. अशी माहिती संभाजीराव टाले यांनी दिली.
.


إرسال تعليق